रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटातील आज दिवसभरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. सायंकाळी झालेल्या दुसऱ्या अपघातात एक एक कार हजार फूट खोल दरीत कोसळली

Raigad tamhini ghat accident
1/8
रायगडच्या ताम्हिणी घाटातील आज दिवसभरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. सायंकाळी झालेल्या दुसऱ्या अपघातात एक एक कार हजार फूट खोल दरीत कोसळली
2/8
दुसऱ्या अपघातातात कारचालक ठार झाला असून याच घाटात सकाळी बसचा देखील अपघात घडला होता.
3/8
पुणे दिशेकडून माणगाव दिशेकडे येत असताना ह्युंदाई कंपनीची ऑरा या कारमधील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी हजारो फूट खोल दरीत कोसळली
4/8
अपघाताची माहिती मिळताच रायगड जिल्ह्यातील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू ऑपरेटर घटनास्थळावर दाखल झाले होते.
5/8
20 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटेही अशीच एक थार कार याच दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती म्हणून आजचा कार अपघात समोर आला, त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय
6/8
ताम्हिणी घाटात सकाळच्या सुमारासही बसचा अपघात झाला होता, या अपघातात 20 जण किरकोळ जखमी झाले. घाटातील गारवा हॉटेल परिसरात खासगी बस डोंगराला धडकून अपघात झाला होता.
7/8
बस अपघातात 5 ते 6 जणांना गंभीर दुखापत झाली होती, पुण्याच्या दिशेकडून माणगाव दिशेकडे येताना या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला
8/8
बस रस्त्याच्याकडेला आदळल्याने प्रवासी जखमी झाले, अपघातस्थळावर माणगाव पोलिसांसह बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले, जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आलं होतं.
Published at : 02 Jan 2026 09:43 PM (IST)