देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी... अगदी अशीच काहीशी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एका पर्यटकासोबत घडली.
Continues below advertisement

Raigad valley car accident driver save
Continues below advertisement
1/7
म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी... अगदी अशीच काहीशी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एका पर्यटकासोबत घडली.
2/7
ज्येष्ठ नागरिक असलेले पर्यटक भरकटले अन त्यांची कार थेट दरीत कोसळली, सुदैवाने 50 फूट अंतरावर ही कार झाडांमुळे अडकली. महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अन् अर्धा तासांच्या थरारानंतर पर्यटकाची सुखरुप सुटका करण्यात आली.
3/7
एखाद्या चित्रपटात घडावी अशी घटना म्हणावी लागेल. याची ही थरारक दृश्य तुम्ही एबीपी माझा वर पाहू शकता. दुपारी बाराच्या सुमारास मोहित भटनागर हे 59 वर्षीय पर्यटक पर्यटनाच्या हेतूने खालापूर हद्दीत आले.
4/7
मिसिंग लिंकवरील टेकडीवर कॅम्पिंगसाठी एक स्पॉट शोधत होते, त्याचवेळी मिसिंग लिंकचा पूल वरुन पाहण्याचा त्यांना मोह झाला. म्हणून टेकडीवरील कच्च्या रस्त्याने ते कारने पुढं निघाले अन भरकटले.
5/7
पुढच्या रस्त्याचा त्यांना अंदाज आला नाही अन अचानकपणे गाडी थेट दरीत कोसळली, सुदैवाने 50 फुटांवरील झाडांमध्ये गाडी अडकली. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
Continues below advertisement
6/7
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या जखमीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. या अपघातात कारचालक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कार झाडाला अडकली अन्यथा थेट ही कार 'मिसिंग लिंक'वर कोसळली असती, असे सांगण्यात आले.
7/7
गारमाळच्या रस्त्यावर फिरायला आलेल्या एका व्यक्तीने स्कोडा कार क्रमांक (MH 04 FK 7143 ) ही कार जंगलात दरीत घेऊन गेला होता. मात्र, ही कार तेथे असलेल्या दलदलीमुळे घसरुन थेट 50 फूट दरीत कोसळली आणि जाऊन झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.
Published at : 03 Aug 2026 04:30 PM (IST)