Chhatrapati Sambhaji Maharaj : "आज आमचा राजा बसला तख्त मराठी वरी!" किल्ले रायगडावर आज छत्रपती संभाजी महाराजांचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा
Sambhaji Maharaj Rajyabhishek Din: छत्रपती संभाजी महाराजांचा आज किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. रायगड श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

Sambhaji Maharaj Rajyabhishek Din
1/10
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा आज दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडतोय.
2/10
दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडवर छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गदुर्गेश्वर रायगड समितीकडून आज गडावर संपूर्ण तयारी करण्यात आलीय.
3/10
जगदीश्वर मंदिरात काल (शनिवारी) शास्त्रयुक्त पद्धतीने पूजा विधी पार पडली.
4/10
त्यानंतर आज (रविवारी) महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र भरातून हजारो शिवभक्त किल्ले रायगडवर दाखल झाले आहेत.
5/10
दरम्यान, मंत्री भरत गोगावले ही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सध्या किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिव-शंभू भक्तांची मांदियाळी बघायला मिळते आहे.
6/10
रायगडावरील होळीच्या माळावर विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सुरू आहेत.
7/10
हर हार महादेव... जय जिजाऊ, जय शिवराय.. जय शंभूराजेंच्या जयघोषानं अवघा गड दणाणून गेला आहे.
8/10
दुर्गराज रायगड श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.
9/10
यावेळी गडावर लहान मावळ्यापासून वयोवृद्ध शिव-शंभू राजांच्या इतिहासाचा आणि पराक्रमाचा जागर घालत त्याची अनुभूती घेत असल्याची भावना व्यक्त करतायत.
10/10
यावेळी राजसदरेवरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर आकर्षक फुलांची आरास करण्यात आली असून संपूर्ण राजसदर फुलांनी सजली आहे.
Published at : 25 Jan 2026 10:00 AM (IST)