Pune Mumbai Highway: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी; उंचीचा अंदाज आलाच नाही थेट कंटेनर ग्रेड सेपरेटरमध्ये घातला अन् अडकला, प्रवाशांना मनस्ताप
Pune Mumbai Highway: सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Pune Mumbai Highway
1/10
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी चौक परिसरात मंगळवारी सकाळी ‘ग्रेट सेपरेटर’मध्ये एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
2/10
सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
3/10
मिळालेल्या माहितीनुसार, उंची मर्यादेपेक्षा जास्त असलेला कंटेनर सेपरेटरखाली जात असताना अडकला.
4/10
त्यामुळे मोरवाडी चौकातून नाशिक फाटा तसेच चिंचवड गावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
5/10
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे काम हाती घेण्यात आले.
6/10
दरम्यान, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली; मात्र कोंडी सुटण्यास सुमारे एक ते दीड तास लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
7/10
या घटनेमुळे ‘ग्रेट सेपरेटर’खालील उंची मर्यादा आणि अवजड वाहनांच्या हालचालीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
8/10
संबंधित विभागाने उंचीबाबत स्पष्ट सूचना फलक लावावेत आणि सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अवजड वाहनांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
9/10
दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
10/10
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Published at : 24 Feb 2026 11:49 AM (IST)