Ravindra dhangekar : 'नॉट रिचेबल' उमेदवारासाठी आमचं मतही नॉट रिचेबल'; कसब्यात पुणेरी पाट्यांची चर्चा
पुणे म्हटलं की, पुणेकरी पाट्या आल्याच. मग त्या एखादी सूचना देणाऱ्या असो, वा एखादी धमकी देणाऱ्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच पुणेरी पाट्यांचा वापर आता पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी करण्यात येत आहे.
कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ या पाट्या आहेत.
अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सगळे पक्ष सज्ज असताना पुणेरी पाट्यांची एन्ट्री झाली आहे.
येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप - मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!, असा आशय या पाट्यांवर लिहिण्यात आलं आहे.
चिंचवड आणि कसबा दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे.
शरद पवारांपासून ते आदित्य ठाकरे पर्यंत सर्व नेत्यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.
येत्या 26 फेब्रुवारीला दोन्ही मतदार संघात निवडणूक होणार आहे.