एक्स्प्लोर
Pune News: डॉक्टरांवर चिल्लर फेकली, बोर्डला काळं फासलं, दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलक आक्रमक!
Pune News: संतापजनक प्रकारानंतर आक्रमक झालेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर जमा झाले.
Pune News
1/7

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते.
2/7

या घटनेनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर आक्रमक झालेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर जमा झाले.
3/7

यावेळी रुग्णालय प्रशासनाला भेटण्याची त्यांच्याकडून मागणी करण्यात येत असताना पोलिसांनी मात्र त्यांना गेटवर अडवल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन बाहेर येऊन या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली अशा प्रकारचा निरोप पोलिसांकडून देण्यात आला.
4/7

तर दिनानाथ मंगेशकर रूग्णालया समोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आल्याने मोठा राडा यावेळी झाला. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. रूग्णालयाच्या पाटीवरती काळा रंगाचा स्प्रे देखील मारण्यात आला.
5/7

त्याचबरोबर आलेल्या अधिकाऱ्यावरती चिल्लर देखील फेकण्यात आली आहे. यावेळी रूग्णालयाच्या नावाला काळं देखील फासलं, रूग्णायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
6/7

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.
7/7

सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही.
Published at : 04 Apr 2025 01:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















