Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, रणरणत्या उन्हात प्रवाशांचे हाल
Pune Nashik Highway: पुणे–नाशिक महामार्गावर चाकण ते खेड दरम्यान असलेल्या शिरोली फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
Continues below advertisement

Pune Nashik Highway
Continues below advertisement
1/10
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने पुणे व मुंबईमधून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
2/10
याच पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून चाकण ते खेड दरम्यानच्या शिरोली फाट्याजवळ मोठी कोंडी निर्माण झाली आहे.
3/10
या ठिकाणी जवळपास दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
4/10
भर दुपारच्या कडक उन्हात वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
5/10
चाकण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच पाहायला मिळते.
Continues below advertisement
6/10
मात्र आता पुणे–नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर परिसरातही अशा प्रकारची कोंडी वारंवार होत असल्याचे दिसत आहे.
7/10
दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी अद्यापही वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे.
8/10
त्यामुळे कोंडी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
9/10
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही काही स्थानिकांनी केले आहे.
10/10
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Published at : 14 Mar 2026 03:58 PM (IST)