एक्स्प्लोर
Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पाणी तुंबलं, फोटो समोर
Pune Rain : पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. एक तासभर झालेल्या मुसळधार पावसानं पुण्यातील काही भागात पाणी साचल्याचं समोर आलं.
पुण्यात मुसळधार पाऊस, विमानतळ परिसरात पाणी साचलं
1/6

आज पुणे शहरात झालेल्या अवकाळी पावसानं पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.एक तासभर झालेल्या पावसामुळं हे चित्र पाहायला मिळालं.
2/6

विमानतळाच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं एवढंच काय तर ड्रेनेज मधून पाणी देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होतं..
3/6

याच साचलेल्या पाण्यातून लोकांना वाट काढत जायला लागत होतं.अजून पावसाळ्याला सुरुवात देखील झालेली नाही मात्र पुणे विमानतळावर अशी परिस्थिती उद्भवली असल्याचं पाहायला मिळालं. काही महिन्यांपूर्वीच या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं हो
4/6

अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे तीन तेरा वाजल्याचं चित्र दिसून आलं. पुणे विमानतळावर पाणीच पाणी पाहायला मिळत होतं. पुणे शहरातील अवघ्या एक तासाच्या झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ पाणी तुंबले.
5/6

पुणे विमानतळावर पाणी तुंबल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.पुणे विमानतळावरील असलेल्या एक्झिट गेट जवळ चेंबर तुंबले होते. दररोज संध्याकाळी पुणे विमानतळावरून हजारो प्रवाशांची ये जा होत असते.अवघ्या एक तासाच्या झालेल्या पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने मोठी गैरसोय झाली
6/6

पुण्यातील काही भागांना पावसाने झोडपले असून अनेक घरात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले. पुण्यातील धानोरी भागात एका रहिवासी इमारतीत पाणी शिरले. पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी ओढाताण झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
Published at : 19 May 2025 09:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग


















