पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
देशभरातील, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग लागल्याने अनेकांची धांदल उडाली.

Shanivar wada fire broke
1/8
देशभरातील, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग लागल्याने अनेकांची धांदल उडाली.
2/8
शनिवार वाड्याजवळील देसाई कॉलेज समोर झाडाचा पाला पाचोळा व झाडाच्या फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. आगीमुळे धुराचे लोटही पसरले
3/8
आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे.
4/8
सुदैवाने आगीत कुठलेही नुकसान झाले नसले तरी आग लागल्याने येथील वाळलेले गवत आणि पालापाचोळा, स्वच्छतेचा मुद्दा समोर आला आहे.
5/8
आगीमुळे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या एका दरवाजापर्यंत आगीचे लोट पोहोचले होते, मात्र त्यावरही पाणी मारण्यात आलं आहे.
6/8
अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
7/8
शनिवार वाडा हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून भारताच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो पर्यंटक पुण्यात शनिवार वाड्याल भेट देतात.
8/8
बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या ऐतिहासिक संदर्भाच्या अनेक खुणा आजही शनिवार वाड्यात इतिहासाची साक्ष देतात.
Published at : 12 Mar 2026 02:03 PM (IST)