पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी

पुण्यातील पोर्शे कार अपघात कधीही न विसरता येण्यासारखा असून पुणे पोलिसांनी देखील तेव्हापासून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

Pune car accident drunk and drive case police

Continues below advertisement
1/8
पुण्यातील पोर्शे कार अपघात कधीही न विसरता येण्यासारखा असून पुणे पोलिसांनी देखील तेव्हापासून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
2/8
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ "ड्रंक अँड ड्राइव्ह" ची घटना घडल्याचं समोर आलं आहे. मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक आणि थेट वाहन दुभाजकावर चढवले
3/8
दुभाजकाला धडकल्याने वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे, डेक्कन पोलिसांकडून कार चालकावर ड्रंक अ‍ॅड ड्राईव्हचा खटला दाखल केला आहे.
4/8
चालकाकडे वाहन परवाना नसताना वाहन धाराशिवमधून चारचाकी चालवत पुण्यात हा प्रताप केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. अनिकेत रमाकांत सोनटक्के (वय 25, चाकण, धाराशिव) असे या कारचालकाचे नाव आहे.
5/8
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या सोनटक्केने सायंकाळी गर्दीच्यावेळी भरधाव वाहन चालवत दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर वाहन पुढे छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दुभाजकावर चढवले
Continues below advertisement
6/8
डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहन चालकाने आधी बालगंधर्व रंगमंदीरजवळ एका दुचाकीला धडक दिली, यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
7/8
या तरुणाने माझी काही नुकसान झाले नाही, म्हणून तक्रार देण्यास नकार दिला आहे. काही अंतरावर असलेल्या एका दुभाजकावर वाहन चढवल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
8/8
सोनटक्के याच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हचा खटला दाखल केला असून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचंही फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
Sponsored Links by Taboola