Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Bhimashankar Temple : धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे.

Bhimashankar Temple
1/9
पावसाच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील भिमाशंकर परिसर निसर्गसौंदर्याने बहरून गेला आहे.
2/9
धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे.
3/9
भिमाशंकर परिसरात सध्या आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे.
4/9
डोंगरांवर पांघरलेली धुक्याची चादर, रिमझिम पावसाच्या सरी आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई यामुळे पर्यटकांची पावले या पर्यटनस्थळांकडे वळत आहेत.
5/9
सह्याद्रीत मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली, तरी सध्याचे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
6/9
मुसळधार पाऊस आणि पडणारे धुके यामुळे मंदिर धुक्यामध्ये हरकून गेले होते. निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
7/9
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भक्तांची कायमच गर्दी असते.
8/9
आता शनिवारी, रविवारीस सुट्टी असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पहावयास मिळाली.
9/9
परिसरात पाऊस पडत असतानाही भाविकांनी रेनकोट परिधान करत रांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले.
Published at : 04 Jul 2026 11:43 AM (IST)