डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे 82 व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने प्रचारात उतरले आहेत.

Vijaysingh mohitepatil 82 years youth ZP Election
1/7
महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून स्ट्रॉंग नेता म्हणून ओळख असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे 82 व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
2/7
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला, तेव्हा त्यांचा वेगळा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील तेवढ्याच उत्साहात प्रचारामध्ये सामील झाल्याचे दिसत आहे.
3/7
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप परिधान करून प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या विजय दादांचा स्वॅग पाहून अनेकांना त्यांच्या तरुणपणातील नेतृत्वाची आठवण झाली.
4/7
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांची साथ देणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोन्ही राष्ट्रवादी फुटल्यानंतर विजयसिंह यांनी शरद पवारांना साथ दिली होती.
5/7
आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यता निर्माण झाले असून जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवीत असल्याने विजय दादा हे या प्रचारसभा मध्ये उत्साहात सामील होताना दिसत आहेत.
6/7
सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी या भाजपच्या विरोधात लढत आहेत, अशावेळी विजय दादा प्रचारासाठी स्टेजवर असणे ही राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठी जमेची बाजू म्हणता येईल. स्वतः दादा प्रचारासाठी उतरल्याने याचा मोठा फायदा दोन्ही राष्ट्रवादीला मिळू शकतो.
7/7
दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे 6 वे उपमुख्यमंत्री बनले होते. त्यांनी 2003 ते 04 या कालावधीत उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
Published at : 24 Jan 2026 08:31 PM (IST)