Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्रात 17 आमदार आणखी वाढणार; विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर, कधी, कुठे, किती वाजता निवडणूक होणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
Continues below advertisement

Vidhan Parishad Election 2026
Continues below advertisement
1/8
Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर करण्यात आली आहे.
2/8
18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
3/8
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत 4 जूनपर्यंत असणार आहे.
4/8
एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
5/8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत.
Continues below advertisement
6/8
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते.
7/8
विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.
8/8
सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Published at : 18 May 2026 11:22 AM (IST)