एक्स्प्लोर
मंत्री महोदयांनी दोस्तासाठी वाट वाकडी केली, उदय सामंतांनी जरांगेच्या कार्यालयात भेट दिली
राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली.
Uday samant meeting Manoj jarnage patil
1/7

राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली.
2/7

उदय सामंत बीड दौऱ्यावर आले असता पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.
3/7

मनोज जरांगे गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिलं होतं.
4/7

image 4
5/7

आता आश्वासनाची मुदत संपत आहे, त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि येत्या 23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्यासंर्दभात चर्चा करणार असल्याचं सामंत यांनी म्हंटलंय.
6/7

मित्रत्वाच्या नात्यानं मी मनोज जरांगे यांची भेट घ्यायला आलोय, असेही सामंत यांनी म्हटल. त्यामुळे, दोस्तासाठी मंत्री महोदयांनी वाट वाकडी करुन जरांगेंची भेट घेतली.
7/7

दरम्यान, मनोज जरांगे यांच्याकडून उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर, मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी काही मुद्द्यांवर चर्चा केली.
Published at : 16 Apr 2025 02:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















