एक्स्प्लोर
मोहिते पाटलांच्या साथीने पुन्हा एकदा नारायण पाटलांच्या अंगावर गुलाल, विधानसभेनंतर शिंदे बंधूंना पुन्हा मोठा धक्का
Solapur Politics : करमाळ्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत संजय शिंदे यांना मोठा धक्का बसलाय.
Solapur Politics
1/10

Solapur Politics : करमाळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळविलेल्या जोरदार यशा नंतर शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी चक्क गहू निवडण्याच्या मशीन मधूनच गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
2/10

या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा जोरदार पराभव करीत विजय घोडदौड सुरू ठेवली आहे.
3/10

त्यामुळे या विजयाचा जोरदार जल्लोष करमाळा तालुक्यात दिसत असून या यशामागे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रयत्न फळाला आले आहेत.
4/10

करमाळ्यात विधानसभेपाठोपाठ शरद पवार गटाने अजित पवार गटाला मोठा दणका दिलाय.
5/10

आदिनाथ कारखान्यावरही पवार गटाची सत्ता निश्चित झाली असल्याची माहिती आहे.
6/10

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटाने तेरा जागा मोठ्या फरकाने जिंकत माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचा मोठा पराभव केला आहे.
7/10

उरलेल्या 9 जागांवरही शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील गट आघाडीवर आहेत.
8/10

त्यामुळे आदिनाथ साखर कारखान्यावरही नारायण पाटील यांची सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
9/10

त्यामुळे संजयमामा शिंदे यांना विधानसभेनंतर आणखी एक मोठा धक्का बसलाय.
10/10

नारायण पाटील यांच्यामागे धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील त्यांची ताकद उभी केली होती.
Published at : 19 Apr 2025 08:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















