एक्स्प्लोर
Thane News : राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंच्या बॅनरने चर्चेला उधाण
Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात एका नव्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकलंय.
Raj Thackeray And Uddhav Thackeray alliance banner
1/6

Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात एका नव्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सुतोवाच दोन्ही नेत्याकडून करण्यात आले आहे.
2/6

महत्वाचे म्हणजे आताखुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या साद आणि राज राज ठाकरेंच्या प्रतिसादामुळे राज्यातल्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
3/6

दरम्यान, या दोन्ही ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या संभाव्य घटनेवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात बॅनर झळकले आहेत.
4/6

ठाण्यातील पडवळ नगर परिसरात हे बॅनर लावण्यात आले असून बॅनरवर उद्धव ठाकरे ,बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा खांद्यावर हात टाकलेला आठवणीला उजाळा देणारा भावनिक फोटो झळकले आहेत.
5/6

तर महाराष्ट्रसाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र..!असा आशय या बॅनरवर लिहाला आहे. सध्या हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात लागल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
6/6

त्यामुळे आगामी काळात काय होईल हे पाहणं महत्वाचे ठरणार असलं तरी हल्लीच्या राजकारणात एक नव्या विषयाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Published at : 20 Apr 2025 09:47 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
























