कराडवरुन पोट्रेट अन् मुंबईतून चाफ्यांचा हार; गुरुवर्य राज ठाकरेंसाठी 'शिवतीर्थ'वर शिष्यांची गर्दी
देशभरात आज गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहाने आणि आपल्या गुरुंप्रती आदर बाळगून, गुरुजनांना वंदन करुन साजरी केली जात आहे.
Guru purnima raj Thackeray mumbai
1/8
देशभरात आज गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहाने आणि आपल्या गुरुंप्रती आदर बाळगून, गुरुजनांना वंदन करुन साजरी केली जात आहे.
2/8
सोशल मीडियावर देखील गुरु पौर्णिमेनिमित्ताने पोस्ट पाहायला मिळत असून स्टेटस आणि व्हिडिओ देखील गुरु पौर्णिमेच्या अनुषंगानेच शेअर केले जात आहेत. राज्यातील शिर्डी साईबाबा मंदिर आणि अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
3/8
राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेही आपल्या राजकीय गुरुच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन गुरुवंदन करत आहेत. या निमित्ताने मनसेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या ठिकाणी पोहचल्याचं पाहायला मिळत आहे
4/8
यंदा वाढदिवसादिनी महाराष्ट्राबाहेर असलेल्या राज ठाकरेंना गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने कार्यकर्ते भेटून शुभेच्छा देत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे हेही सर्वांना भेटून शुभेच्छा स्वीकारत आहेत. मनसे पदाधिकारी दिनेश साळवी हे चाफ्यांच्या फुलांचा हार घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते .
5/8
गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा चाहता एक स्पेशल पोट्रेट घेऊन त्यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्याबाहेर पोहोचला आहे. तो सांगली जिल्ह्यातील कराड येथून त्यांच्या भेटीला आला आहे.
6/8
राज ठाकरे स्वत: व्यंगचित्रकार आहेत, त्यामुळे कराडमधून आलेल्या ऋषिकेशने राज ठाकरेंचं एक पोट्रेट चित्र घेऊन शिवतीर्थ बंगला गाठला असून तो राज ठाकरेंना हे चित्र गुरु पौर्णिमेनिमित्त भेट देणार आहे.
7/8
दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.
8/8
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, दोन ठाकरे बंधूंच्या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
Published at : 10 Jul 2025 01:44 PM (IST)