Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर काल जोरदार तोफ धडाडली.
Continues below advertisement
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha
Continues below advertisement
1/20
Raj Thackeray Uddhav Thackeray Sabha: तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर काल जोरदार तोफ धडाडली.
2/20
मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलंय.
3/20
तसचं मुंबई अदानींना देण्यासाठी भाजपला मुंबई जिंकायची असल्याच उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.
4/20
भाजप ब्रँडवरूही उद्धव ठाकरेंनी हल्ला केलाय. ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असून मुंबईला वाचवा असं आवाहन राज ठाकरेंनी मुंबईकरांना केलंय.
5/20
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांचे ठाकरे शैलीतील विचार ऐकण्यासाठी शिवतीर्थ, दादर येथे न भूतो न भविष्यती अशा पार पडलेल्या सभेला मराठी माणसांची अलोट अशी गर्दी स्वयंस्फूर्तीने आलेली संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळाली.
Continues below advertisement
6/20
ठाकरे बंधूंचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांना एकत्र पाहण्यासाठी मुंबईतील कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले होते.
7/20
ठाकरे बंधूंना शिवतीर्थावर एकत्र बघून काही शिवसैनिक भावूक झाल्याचे देखील दिसून आले.
8/20
जगामध्ये अदानींप्रमाणे 10 वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
9/20
वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार, असा दावा राज ठाकरेंनी केला.
10/20
देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?, असं राज ठाकरे म्हणाले.
11/20
ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा.माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा, असं आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केलं.
12/20
जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागा, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
13/20
'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय, असं राज ठाकरे म्हणाले.
14/20
तर आम्ही मुंबई लुटू देणार नाही, तुटू देणार नाही, झुकू देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावले.
15/20
महाराष्ट्र मरु शकत नाही, महाराष्ट्राला कोणी मारु शकत नाही आणि जो महाराष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
16/20
जगायचं असेल तर वाघासारखं जगा, शेळीसारखं जगायचं असेल तर भाजपमध्ये जा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
17/20
आमच्यामधले वाद आम्ही काढून टाकले आणि मराठी माणसांसाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रसाठी एक ताकद बनवून उभे राहिलो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
18/20
मातृभाषेचं प्रेम रक्तात असावं लागतं. आमच्या मातृभूमीचे लचके तोडले जात असताना, आम्ही शेपूट घालून घरात बसू असं यांना वाटलं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
19/20
मराठी माणसाने रक्त सांडून ही मुंबई मिळवलेली आहे. आमच्या घराण्याची परंपरा म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यावर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी उभे राहिले आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
20/20
मतदानादिवशी सकाळी 6 वाजता सगळे कार्यकर्ते, बीएलओ जे नेमलेत ते मतदान दिवशी तयार राहा, सतर्क राहा बेसावध राहू नका. दुबार मतदार आला तर त्याला सकाळी 7 वाजताच त्याला फोडून काढा, असे आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले.
Published at : 12 Jan 2026 07:24 AM (IST)
= 20">