Prakash Mahajan Meet Eknath Shinde: मी राज ठाकरेंना घाबरत नाही म्हणणाऱ्या प्रकाश महाजनांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट; म्हणाले...
Prakash Mahajan: राज ठाकरेंच्या मनसेची साथ सोडलेल्या प्रकाश महाजन यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.

Prakash Mahajan Eknath Shinde
1/7
Prakash Mahajan: राज ठाकरेंच्या मनसेची साथ सोडलेल्या प्रकाश महाजन यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
2/7
प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेना शिंदे गटात येण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
3/7
प्रकाश महाजन यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
4/7
आज दुपारी साडेबारा वाजता ठाण्यात प्रकाश महाजन शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.
5/7
काही दिवसांआधी प्रकाश महाजन यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी काही वैयक्तिक कारण असल्याचं प्रकाश महाजन म्हणाले होते. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवलं नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असं प्रकाश महाजन म्हणाले होते.
6/7
कोण आहेत प्रकाश महाजन?- प्रकाश महाजन हे महाराष्ट्रातील एक राजकीय व्यक्तिमत्व आहेत. ते प्रसिद्ध राजकारणी प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत, जे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री होते.
7/7
प्रकाश महाजन या नात्यामुळे आणि स्वतःच्या राजकीय कार्यामुळे प्रकाश महाजन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चेत राहिले आहेत.
Published at : 26 Dec 2025 07:16 AM (IST)