PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
CJP PM Modi and Sandeep Deshpande: मनसेचे संदीप देशपांडे हे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. त्यांचा टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Continues below advertisement

PM Modi and Sandeep Deshpande
Continues below advertisement
1/5
जंतर मंतरवरील आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
2/5
संदीप देशपांडे हे आजच्या मुंबईतील आंदोलनात एक टी-शर्ट घालून उतरणार आहेत. या टी-शर्टवर पंतप्रधान मोदी यांचा मॉर्फ केलेला फोटो असून त्यावर 'झुटलर' असे लिहले आहे.
3/5
हिटलर का बेटा झुटलर. पंतप्रधान मोदींचा फोटो असलेला टी-शर्टची चर्चा
4/5
संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या माध्यमातून त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये झुरळ मारण्याच्या स्प्रेवर नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे. या फोटोसोबत 'झुरळांनी बेगॉनला हरवलं', असे कॅप्शन संदीप देशपांडे यांनी लिहले आहे. संदीप देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
5/5
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, काल धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुंबईत विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा आनंद साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे हे सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत.
Continues below advertisement
Published at : 26 Jul 2026 08:56 AM (IST)