Ganesh Visarjan 2026: विधानसभा निकालानंतर प्रथमच थोरात, तांबे आणि खताळ एकाच मंचावर, संगमनेरमध्ये गणरायाला निरोप देताना काय घडलं? PHOTO
Ganesh Visarjan 2026: गणरायाला निरोप देण्यासाठी विधानसभा निवडणुक निकालानंतर प्रथमच खताळ व थोरात आणि तांबे हे एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.
Continues below advertisement

Ganesh Visarjan 2026
Continues below advertisement
1/8
संगमनेर शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री इच्छापूर्ती गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. रंगार गल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री इच्छापूर्ती गणेश उत्सवाला तब्बल 131 वर्षांची परंपरा आहे.
2/8
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आजी माजी आमदार एकाच मंचावर आले.
3/8
विसर्जन मिरवणुकीपूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
4/8
विशेष म्हणजे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित असलेले हे नेते गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
5/8
आरतीनंतर सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत आमदार अमोल खताळ यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला.
Continues below advertisement
6/8
त्यामुळे मिरवणुकीत उपस्थित गणेशभक्तांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.
7/8
राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून या संकटातून सावरण्याची शक्ती गणरायाने द्यावी, अशी प्रार्थना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार अमोल खताळ यांनी यावेळी केली.
8/8
प्रार्थना करताना मानपान व ज्येष्ठ, तरुण यावरून एकमेकांना टोले द्यायला देखील दोन्ही नेते विसरले नाही हे विशेष.
Published at : 25 Sep 2026 11:41 AM (IST)