एकनाथ शिंदेंची वारी, शिवाजी चौक ते मंदिर चालत घेतले विठुरायाचे दर्शन; बुलेटवरुन पंढरीच्या यात्रेची पाहणी
पंढरीत व्हिआयपी दर्शनरांग बंद करण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाळल्याचं पाहायला मिळालं
Eknath Shinde pandharpur darshan
1/11
पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून व्हिआयपी दर्शनरांग बंद करण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाळल्याचं पाहायला मिळालं
2/11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आमदार समाधान आवताडे आणि शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे पंढरपूरच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते.
3/11
प्रत्येक वेळी दर्शनाला एखादा मंत्री जाताना किमान 50 ते 100 लोके सोबत जात असतात, यावेळेला केवळ मोजके 6 मान्यवर आत गेले होते. त्यामुळे, दर्शनसाठीचा प्रोटोकॉल मंत्री महोदयांना पाळला.
4/11
उपमुख्यमंत्र्यांनी एकाच वेळेला नो वेहिकल झोन आणि नो व्हीआयपी दर्शन हे दोन्ही नियम पाळले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवाजी चौकातून थेट पायी चालत मंदिरात पोहोचत नो व्हेईकल झोन नियम देखील पाळला
5/11
उपमुख्यमंत्री मंदिरातही गेले असता सर्वसामान्य भाविकांचे दर्शन रांग सुरूच होती, त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शन रांगेत कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्या बुलेटवर मागे बसून यात्रा पाहणी देखील केली.
6/11
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले
7/11
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली.
8/11
चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज शिष्टाचार नुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समिती मार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे.
9/11
परंतु , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता. भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिरपर्यंत दर्शनासाठी चालत गेले.
10/11
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर, मंदिर परिसर, दर्शन रांग (पत्रा शेड), भक्ती सागर(65 एकर) या ठिकाणी वारकरी, भावीकांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
11/11
वारी काळात सर्व पालखी सोहळ्या समवेत येणारे वारकरी, भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.
Published at : 03 Jul 2025 09:31 PM (IST)