Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची बुलेटवरून 'रॉयल' एन्ट्री; दुचाकीवरून गाठले विधान भवन, PHOTO
Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाले.

Devendra Fadnavis
1/10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी थेट दुचाकीवरून विधान भवन गाठल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.
2/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले.
3/10
मुख्यमंत्री फडणवीस स्वतः 'रॉयल एनफिल्ड ३५०' ही बाईक चालवत विधान भवनात दाखल झाले.
4/10
मुख्यमंत्र्यांच्या सोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील दुचाकीवरून या प्रवासात सहभागी झाले होते.
5/10
विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला.
6/10
सध्या अनेक मंत्री आणि आमदार इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असताना, मुख्यमंत्र्यांनी दुचाकीचा वापर करून एक नवा पर्याय समोर ठेवला आहे.
7/10
मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी दुचाकीचा वापर करणे हा प्रभावी मार्ग असल्याचे या कृतीतून सुचवण्यात आले.
8/10
राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे साध्या पद्धतीने प्रवास केल्याने सामान्य नागरिकांमध्ये इंधन बचतीबाबत सकारात्मक संदेश दिला गेल्याचे बोलले जात आहे.
9/10
कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही मुख्यमंत्र्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने, हेल्मेट घालून आणि नियमांचे पालन करत हा प्रवास पूर्ण केला.
10/10
मुख्यमंत्र्यांच्या या 'रॉयल' एन्ट्रीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published at : 14 May 2026 11:34 AM (IST)