महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
राजधानी दिल्लीत सीजेपीच्या नेतृत्वात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात आंदोलन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातही आंदोलन सुरु झाले आहे.
Continues below advertisement

Tushar gandhi detained aaditya Thackeray
Continues below advertisement
1/13
राजधानी दिल्लीत सीजेपीच्या नेतृत्वात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात आंदोलन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातही आंदोलन सुरु झाले आहे.
2/13
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, तर वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्यावतीने हुतात्मा स्मारक, मुंबई येथे आंदोलन करण्यात आले
3/13
मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत ताब्यात घेतल्याचा आरोप वंचितकडून केला जात आहे
4/13
मुंबई पोलिसांनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सुरू असलेल्या आंदोलनातून आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
5/13
पोलिसांनी आंदोलन ठिकाणी ड्रोन आणले असून ड्रोनवरून आंदोलकांवर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement
6/13
विशेष म्हणजे पोलिसांनी कलाकारांनाही ताब्यात घेतले आहे, आमिर खानचा भाचा इम्रान खान यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं.
7/13
मुंबईतील आंदोलनातून माजी आमदार कपिल पाटील यांनीही पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
8/13
पुण्यातही सीजेपीचे आंदोलक आक्रमक झाले असून पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.
9/13
पुण्यातील श्रीमंत पेशवा गणेश मंदिर आणि शनिवार वाड्याजवळ आंदोलक एकत्र आले आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेतलं जात आहे.
10/13
पुण्यातील रस्त्यावरही आता ज्ञानेश कुमांरांविरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन केले जात आहे
11/13
दुसरीकडे मुंबईतील डी.एन. नगर पोलिसांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.
12/13
जोपर्यंत तुषार गांधी यांना सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस स्थानकातून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.
13/13
मुंबईतील सगळे शिवसैनिक हे या पोलीस स्थानकाबाहेर जमतील, आदित्य ठाकरेंनी पोलिसांसोबतच्या चर्चेत भूमिका मांडली. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मागील 7-8 तासांपासून तुषार गांधी यांना डी एन नगर पोलीस स्थानकात डिटेन करून ठेवले आहे. त्यांना सोडविण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे
Published at : 10 Oct 2026 06:13 PM (IST)