Dasara Melava: बीडमधील कुठल्या दसरा मेळाव्याला किती गर्दी? पाटील-मुंडेंनी मैदान गाजवलं, पाहा फोटो
Dasara Melava: विजयादशमीच्या मुहूर्तावर आज मुंबईत दोन, बीडमध्ये दोन दसरा मेळावे होत असून दुपारच्या सुमारास पंकजा मुंडेंचा सावरगाव येथे दसरा मेळावा संपन्न झाला.

Beed Dasara melava manoj jarange patil and pankaja munde
1/11
विजयादशमीच्या मुहूर्तावर आज मुंबईत दोन, बीडमध्ये दोन दसरा मेळावे होत असून दुपारच्या सुमारास पंकजा मुंडेंचा सावरगाव येथे दसरा मेळावा संपन्न झाला.
2/11
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायण गडावर संपन्न झाला, या मेळाव्यासाठी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
3/11
मनोज जरांगे थेट रुग्णालयातून मेळाव्यासाठी हजर झाले होते, त्यामुळे नारायण गडावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते थेट मेळाव्याच्या व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं.
4/11
मनोज जरांगे पाटील भावनिक झाले होते, डोळ्यात अश्रू आणि हाताला सलाईनची सूई घेऊन त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केले, यावेळी विविध मुद्द्यांवर भाषण करत शेतकऱ्यांसाठी मागण्याही केल्या आहेत.
5/11
शेतकऱ्यांना कर्जमाफी, अतिवृष्टीची आर्थिक मदत दिवाळीपर्यंत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आले होते.
6/11
नारायण गड परिसरात मोठी गर्दी मराठा बांधवांची जमली होती, त्यामुळे येथील मैदानावर माणसंच-माणसं दिसत होती, तर गाडी पार्किंगची सोयही मोकळ्या मैदानावर करण्यात आली होती.
7/11
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील दसरा मेळावा सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर संपन्न झाला. पंकजा मुंडेंनीही आपल्या भाषणातून जातीवादाचा राक्षस संपविण्याचं आवाहन केलंय.
8/11
विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
9/11
यंदाही या मेळाव्यास अखंड महाराष्ट्रातून विराट जनसागर उसळला होता. या जनसमुदायासमोर नतमस्तक होऊन उपस्थित जनतेस संबोधित करत दसर्याच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी संत श्री.भगवान बाबांची विधिवत पूजा आणि आरती करून बाबांच्या चरणी नतमस्तक झाले, असे पंकजा यांनी म्हटलं.
10/11
पंकजा मुंडेंसह येथील मेळाव्यासाठी आ. धनंजय मुंडे, मा. खा.प्रितम मुंडे, मा. मंत्री महादेव जानकर, आ. मोनिकताई राजळे, आ.नारायण कुचे, आ.नमिता मुंदडा, आ.मनोज कायंदे, आ.संजय केनेकर, आ.उमाताई खापरे यांसह जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होती.
11/11
दरम्यान, दोन्ही मेळाव्याला मोठ्या प्रमाणत गर्दी झाली होती. या मेळाव्यातील गर्दीचे ड्रोन शूट व्हिडिओ समोर आले असून नेमकं कुठे जास्त गर्दी झाली हे सांगता येणार नाही पण फोटोतून गर्दीचा अंदाज घेता येईल
Published at : 02 Oct 2025 05:51 PM (IST)