Ajit Pawar : कऱ्हा नदी पात्रात अजित पवारांचं रक्षा विसर्जन; पाहा PHOTO
Ajit Pawar Raksha Visarjan Vidhi : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर आज 30 जानेवारी 2026 ला अस्थी विसर्जनाचा विधी पार पडला.

Ajit Pawar Raksha Visarjan Vidhi
1/8
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत निधन झाले.
2/8
त्यानंतर काल गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
3/8
अंत्यसंस्कार विधी झाल्यानंतर संपूर्ण बारामतीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे.
4/8
या दुर्घटनेमुळे राजकीय वातावरणही कोलमडलं आहे. तसेच सामान्य जनतेच्याही अश्रूंचा बांध फुटला आहे.
5/8
गुरुवारी अजित पवारांच्या अंत्यसंस्कार विधीला राजकीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
6/8
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर आज 30 जानेवारी 2026 रोजी बारामतीतील कऱ्हा नदीपात्रात अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं.
7/8
यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते.
8/8
अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबियांवरच नव्हे तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
Published at : 30 Jan 2026 11:09 AM (IST)