Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Ajit Pawar Jayanti: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज जयंती निमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर अतिशय भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
Continues below advertisement

Ajit Pawar Birth Anniversary
Continues below advertisement
1/6
Ajit Pawar Birth Anniversary :राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज जयंती आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर एक अतिशय भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तर दुसरीकडे जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं आहे.
2/6
दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी बारामती येथील विद्याप्रतिष्ठान परिसरातील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी दादांच्या कार्याचा, राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
3/6
अजितदादा पवार यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर एक अतिशय भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
4/6
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...
5/6
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
Continues below advertisement
6/6
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!
Published at : 22 Jul 2026 08:33 AM (IST)