Parbhani : पाऊस आणि पुराने 10 एकर सोयाबीनचा अक्षरशः चिखल; परभणीच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची व्यथा
Parbhani : यंदा पाऊस आणि पुराने याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा आकांक्षाचा चिखल झाला आहे.
Continues below advertisement
Parbhani
Continues below advertisement
1/8
सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख पीक. मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीनची लागवड करतात.
2/8
मात्र, यंदा पाऊस आणि पुराने याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा आकांक्षाचा चिखल झाला आहे.
3/8
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील प्रदीप अंबोरे यांनी आपल्या 10 एकरमध्ये सोयाबीन घेतले.
4/8
पहिल्यांदा पाऊस नसल्याने सोयाबीन उगवलेले नाही पुन्हा कर्ज काढून दुसऱ्यांना सोयाबीन लागवड केली.
5/8
मात्र, सतत पडलेल्या पाऊस आणि करपरा नदीला आलेल्या पुरामुळे शेंगा लागलेल्या आणि काही दिवस काढणी करायला आलेल्या सोयाबीनमध्ये गुडघ्या एवढा चिखल झालाय.
Continues below advertisement
6/8
त्यामुळे त्यांनी दरवर्षीप्रमाणे आपले सोयाबीन वर केलेल्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचा,मुलांच्या शिक्षणाचा,आशा आकांक्षाचा,चिखल झालाय.
7/8
आता दसरा दिवाळी कशी करायची लेकी बाळींना सणासाठी कसे आणावे असे एक ना अनेक प्रश्न प्रदीप यांना आणि त्यांच्या सारख्याच इतर शेतकऱ्यांना पडले आहेत.
8/8
त्यामुळे त्यांनी देवाभाऊ यांच्याकडे भरीव मदतीसाठी याचना केलीय.
Published at : 29 Sep 2025 08:20 AM (IST)