पालघरमध्ये उघड्या नाल्याद्वारे केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने माशांचा खच, शेतीचंही नुकसान
वाडा तालुक्यातील मुसारणे येथील उघड्या नाल्यामध्ये कारखान्यामधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक केमिकलयुक्त पण्यामुळे मासे आणि जलचर मेल्याने मोठा खच पडल्याची घटना समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया नाल्याच्या शेजारी टायर वितळवणारी कंपनी तसेच इतर दोन कंपन्या असून या कंपनीतून रासायनिक पाणी सोडले असल्याची शंका स्थानिकांनी उपस्थित केली आहे.
मुसारणे इथून वाहणारा हा मोठा नाला असून या नाल्याचं पाणी थेट नदीमध्ये जाते तर या नाल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात शेती असून शेतीतही नुकसान झालं आहे
दुसरीकडे याच नाल्यातून दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांची गुरं ढोरं आणि म्हशी चरण्यासाठी आल्यावर पाणी पीत असून या जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबतीत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करुनही लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तर कुडूस परिसरातही मध्यरात्रीच्या सुमारास रासायनिक द्रव्य टँकरने आणून नाल्यात आणि वाडा भिवंडी महामार्गावर सोडून दिल्याच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत.
इतकंच नाही तर या भागात अंधाराचा फायदा घेऊन हे केमिकल माफिया बाहेरील कंपन्यांचे रासायनिक द्रव्य टँकरने आणून सोडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
मुसारणे इथे नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहत आल्याने इथल्या रहिवाशांना उग्र वास आणि डोळ्यांची जळजळ होत असल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शेती, मासेमारी आणि जनावरांवर विपरीत परिणाम झाला आहे. जर याबाबतीत कारवाई झाली नाही तर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा इथल्या स्थानिकांनी दिला आहे.