Pahalgam Terror Attack: काल बाजूला बसून राहिली, आज मृतदेहसमोर येताच म्हणाली, जय हिंद..., अख्ख्या भारताचे डोळे पाणावले!
Pahalgam Terror Attack: नौदल अधिकारी विनय नरवाल यांचं मृतदेह समोर येताच पत्नी हिमांशीला अश्रू अनावर झाले.

Pahalgam Terror Attack
1/10
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल (22 एप्रिल) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. (photo credit- ANI)
2/10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक फोटो देशभर प्रचंड व्हायरल झाला. या फोटोने सर्वजण थक्क झाले. (photo credit- ANI)
3/10
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल मृतावस्थेत पडलेले आणि त्यांची नवविवाहित पत्नी हिमांशी नरवाल त्यांच्या शेजारी अस्वस्थ अवस्थेत बसलेली दिसत आहे. (photo credit- ANI)
4/10
26 वर्षीय विनय नरवाल आणि हिमांशी यांचे 16 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झाले होते आणि त्यानंतर 19 एप्रिल रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. (photo credit- ANI)
5/10
हिमांशी गुरुग्रामची रहिवासी होती. तर विनय कर्नालचा होता. लग्नानंतर दोघांनीही हनिमूनसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला आणि पहलगामला भेट दिली. पण ती भेट तो क्षण आणि ती सोबत अखेरची ठरेल असं कोणाच्या ध्यानीमनी देखील आलं नसावं.(photo credit- ANI)
6/10
विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनला गेले होते. भेळपुरी खाताना अतिरेक्यांनी धर्म विचारुन विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या.(photo credit- ANI)
7/10
आज विनय नरवाल याचं मृतदेह नवी दिल्लीत आणण्यात आले. यावेळी त्यांची पत्नीसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. (photo credit- ANI)
8/10
विनय नरवाल यांचं मृतदेह समोर येताच पत्नी हिमांशीला अश्रू अनावर झाले. (photo credit- ANI)
9/10
आज लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन हिमांशी म्हणाली, जय हिंद विनय...(photo credit- ANI)
10/10
दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ पाहून संपूर्ण भारत हळहळल्याचे पाहायला मिळाले. (photo credit- ANI)
Published at : 23 Apr 2025 03:52 PM (IST)