गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना

राज्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यात, गेल्या आठवडाभरातही पाऊस चांगला झाला आहे.

Someshwar waterfall nashik

1/7
राज्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यात, गेल्या आठवडाभरातही पाऊस चांगला झाला आहे.
2/7
मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली असून नद्या, तलाव आणि काही धरणं देखील पूर्ण भरुन वाहत आहेत. अनेक पर्यटनस्थळी धबधबेही वाहत आहेत.
3/7
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. 6000 क्युसेक इतका विसर्ग गंगापूर धरणातून केल्याने गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
4/7
धरणातून झालेल्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे, अतिशय आकर्षक असलेल्या सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
5/7
धबधब्याचा प्रवाह पाहता प्रशासनाकडून वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात आले आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत
6/7
धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाने दिलेला आहे, तर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
7/7
सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येतात, तर मुंबई, पुण्यासह नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांची मोठी गर्दी असते
Sponsored Links by Taboola