Nashik Rains : मुसळधार पावसाने गोदामाई खळाळली! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Nashik Rains : नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Nashik Rains
1/10
नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
2/10
गोदावरीच्या पुराचे मापक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे.
3/10
रामकुंड परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला आहे.
4/10
तसेच भाजीपटांगणातही पुराचे पाणी घुसले आहे
5/10
गंगापूर धरणातून नदीपात्रात 5,160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
6/10
होळकर पुलाखालून सध्या 8,000 क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी वाहत आहे.
7/10
सकाळी 10 वाजल्यापासून गंगापूर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
8/10
धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.
9/10
शहरातील नदीकिनाऱ्यावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
10/10
शनिवारी रात्री पुराच्या पाण्यात तरुण अडकला होता. पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंटच्या खांबाचा आधार घेतला. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने तरुणाला बाहेर काढले.
Published at : 06 Jul 2025 12:15 PM (IST)