Nashik News: नाशिकमध्ये सापडली 150 वर्षांपूर्वीची प्राचीन विहीर; थंडगार पाण्याने तुडुंब भरलेल्या दगडी विहिरीची रचना पाहून सर्वच चक्रावले, PHOTO
Nashik News: नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात सुरू असलेल्या अंडरपासच्या कामादरम्यान शेकडो वर्षे जुनी विहीर सापडल्याची घटना समोर आली आहे.

Nashik News
1/10
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी द्वारका परिसरात अंडरपासचे काम सुरू आहे.
2/10
काम सुरू असताना एका बाजूला अचानक जमिनीत भगदाड पडल्याचे कामगारांच्या लक्षात आले.
3/10
कामगारांनी जवळ जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी पाण्याने भरलेली विहीर असल्याचे दिसून आले.
4/10
ही विहीर स्वच्छ आणि थंडगार पाण्याने तुडुंब भरलेली असल्याचे दिसून आले.
5/10
स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या माहितीनुसार ही विहीर सुमारे 150 ते 159 वर्षे जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
6/10
पूर्वी या परिसरात शेती आणि काही घरांची वस्ती असल्याने ही विहीर त्या काळात पाण्याचा मुख्य स्रोत होती, असे सांगितले जाते.
7/10
विहिरीतील पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
8/10
अचानक समोर आलेल्या या विहिरीमुळे अंडरपासच्या कामावर तात्पुरता परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे.
9/10
ही ऐतिहासिक विहीर जतन करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
10/10
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या विहिरीचा योग्य वापर केल्यास भविष्यात पाण्याच्या समस्येवर काही प्रमाणात उपाय होऊ शकतो, असेही नागरिकांचे मत आहे.
Published at : 15 Mar 2026 02:11 PM (IST)