गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे पक्के राजकारणी आहेत, तितकेत ते चांगले प्रेक्षक, रसिक आणि स्पोर्टसमनही आहेत. कधी क्रिकेटच्या मैदानात तर, कधी गाण्यांच्या मैफिलीतही ते तितकेच दाद देताना दिसून येतात.
Continues below advertisement

CM Devendra Fadnavis sing a song gulabi aankhe
Continues below advertisement
1/8
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे पक्के राजकारणी आहेत, तितकेत ते चांगले प्रेक्षक, दर्दी रसिक आणि स्पोर्टसमनही आहेत. कधी क्रिकेटच्या मैदानात तर, कधी गाण्यांच्या मैफिलीतही ते तितकेच दाद देताना दिसून येतात.
2/8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील 'खासदार क्रीडा महोत्सव 2026 समारोप समारंभास' प्रमुख उपस्थिती दर्शवली.
3/8
नागपूरसह विदर्भातील विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, सदाबहार गाण्याच्या कार्यक्रमानेही या कार्यक्रमात रंगत पाहायला मिळाली.
4/8
विशेष म्हणजे गायिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासमोर येऊन काही गाणी गायली, तर मुख्यमंत्र्यांकडे माईकही देऊ केला.
5/8
मुख्यमंत्र्यांनीही गायिकेच्या विनंतीला मान देत माईक हाती घेऊन दोनवेळी गाणे गायले. राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील, गुलाबी आँखे जो तेरी देखी.. हे गाणं देवेंद्र फडणवीस यांनी गायलं.
Continues below advertisement
6/8
तसेच, अभिनेता धमेंद्रच्या ब्लॅकमेल सिनेमातील पल पल दिल के पास... हेही गाणं मुख्यमंत्र्यांनी गायलं. त्यामुळे, गाण्याच्या या कार्यक्रमातही फडणवीसांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आला.
7/8
देवाभाऊंनी गायलेल्या या गाण्यालाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर, गायिकेनेही आभार मानले.
8/8
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा गाणं गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून भाजप समर्थकांकडून देवाभाऊंमधील रसिक, मनमोकळ्या व्यक्तीमत्त्वाचं कौतुक होत आहे.
Published at : 07 Jun 2026 08:03 PM (IST)