एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Nagpur Accident News : सिग्नलवर उभ्या असलेल्या कार अन् दुचाकीला टिप्परची धडक; नागपूरच्या गोरेवाडा-मानकापूर रोडवरील घटना
Nagpur Accident News : नागपूरच्या गोरेवाडा-मानकापूर रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात सिग्नलवर उभ्या असलेल्या कार अन् दुचाकीला टिप्परने धडक दिली आहे.
Nagpur Accident News
1/6

नागपूरच्या गोरेवाडा-मानकापूर रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे.
2/6

यात पलोटी शाळेजवळ सिग्नलवर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला पाठीमागून अनियंत्रित स्वरूपात आलेल्या टिप्परने जोरदार धडक दिली आहे.
3/6

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी आणि कारमध्ये बसलेले अनेक लोक या घटनेत गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
4/6

तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त कार आणि दुचाकी बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
5/6

वाळूच्या ट्रकने एक कार, एक दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पान टपरीला धडक दिली आहे.
6/6

वाळूचा ट्रकने धडक दिलेल्या कार आणि पान टपरीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात घुसला आहे. दरम्यान यावेळी मोठा जमाव देखील घटनास्थळी जमला आहे.
Published at : 06 Apr 2025 02:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















