Nag Panchami 2025: 23 वर्षांनंतर सांगलीमधील बत्तीस शिराळ्याच्या मंदिरात जिवंत नागाचे दर्शन, PHOTO
Nag Panchami 2025: आज नागपंचमी आहे आणि नागदेवतेसाठी संपूर्ण देशामध्ये बत्तीस शिराळा हे प्रसिद्ध आहे.

Nag Panchami 2025
1/6
तब्बल 23 वर्षानंतर आज सांगलीच्या बत्तीस शिराळ्यात जिवंत नागाचे दर्शन घेता येणार आहे.
2/6
आज नागपंचमी आहे आणि नागदेवतेसाठी संपूर्ण देशामध्ये बत्तीस शिराळा हे प्रसिद्ध आहे.
3/6
मात्र गेल्या 23 वर्षांपासून या ठिकाणी जिवंत नागाची पूजा किंवा खेळ करण्यास कोर्टाने बंदी घातली होती.
4/6
यावेळी मात्र केंद्रातील विविध विभागांनी परवानगी दिल्यानंतर 21 जणांना जिवंत नागाचे दर्शन देण्यासाठी परवानगी दिली आहे.
5/6
मात्र यामध्ये नागाला कोणतीही इजा करायची नाही, कोणतेही खेळ करायचे नाहीत.केवळ नागाच्या संदर्भात प्रबोधन करायचं इतकीच परवानगी दिली आहे.
6/6
दरम्यान, नागपंचमी हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जाते. या दिवशी सर्प (नाग) देवतेची पूजा केली जाते.
Published at : 29 Jul 2025 09:32 AM (IST)