मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानातील ‘बीट्टू’ बिबट्याचा मृत्यू; प्रताप सरनाईकांशी होतं खास नातं, लेकाची भावुक पोस्ट
मुंबईच्या बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बीट्टू’ नावाच्या 6 वर्षांच्या नर बिबट्याचा 21 मार्च 2026 रोजी दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला.

Leopard dead Sanjay gandhi national park
1/8
मुंबईच्या बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बीट्टू’ नावाच्या 6 वर्षांच्या नर बिबट्याचा 21 मार्च 2026 रोजी दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला.
2/8
बीट्टू हा 2019 मध्ये ठाणे वन विभागातील येऊर परिसरातून बचाव करून उद्यानात आणण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आजाराची लक्षणे दिसत होती आणि त्याच्यावर पशुवैद्यकीय उपचार सुरू होते.
3/8
तपासणीत त्याला पॉलीसिस्टिक किडनी डिसीज हा आजार असल्याचे समोर आले. अखेरीस प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपासणीसाठी जैविक नमुने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.
4/8
मागील काही महिन्यांपासून बिट्टू आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याच्या प्रकृतीत सातत्याने खालाव होत गेला. सोनोग्राफी तपासणीत ‘पॉलीसिस्टिक किडनी डिसीज’ असल्याचे निष्पन्न झाले होते. अखेर अंतर्गत गुंतागुंत वाढल्याने त्याचा मृत्यू झाला.
5/8
शवविच्छेदनात मूत्रपिंडात सिस्ट्स आढळून आल्या असून प्राथमिक तपासणीत मूत्रपिंड विकारामुळे बहुअवयव निकामी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील तपासणीसाठी नमुने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ येथे पाठवण्यात आले आहेत.
6/8
राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी बिट्टू या बिबट्याला दत्तक घेतले होते. त्यामुळे, बिट्टूच्या निधनानंतर त्यांनीही आठवणी जागवत शोक व्यक्त केलाय.
7/8
आज आपल्या सर्वांचा लाडका, आपला दत्तक घेतलेला बाळ… “Bittu Boss” आपल्याला सोडून गेला. तो फक्त एक प्राणी नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा एक भाग होता.
8/8
बिट्टूच्या आठवणी, त्याची निरागसता आणि आपुलकी सदैव आपल्या मनात जिवंत राहतील, असे ट्विट पूर्वेश सरनाईक यांनी केलंय. Bittu Boss, तुझ्या आत्म्यास शांती लाभो, असेही त्यांनी म्हटलं.
Published at : 22 Mar 2026 03:38 PM (IST)