Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
Naigaon BDD Chawl Photo: नायगाव बीडीडी चाळीतील 160 चौ.फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौ.फुटांचे घर मिळाले आहे.
Continues below advertisement

Naigaon BDD Chawl New Building Photo
Continues below advertisement
1/10
Naigaon BDD Chawl Photo: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या वतीने मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील उपस्थित होत्या.
2/10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज काही लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या आणि ताबा पत्र सुपूर्द करण्यात आले.
3/10
म्हाडाकडून 23 मजल्यांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. नायगाव बीडीडी चाळीतील 160 चौ.फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौ.फुटांचे घर मिळाले आहे.
4/10
पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार झाल्या असून आज 864 घरांचे चावी वाटप करण्यात आले. नायगावमधील बीडीडी चाळीचा पुर्नविकासाचे काम एल अँण्ड टी कंपनीमार्फत करण्यात आले.
5/10
आज 864 सदनिकादारकांना चाव्या देण्यात आल्या. यामध्ये शोभा तुकाराम गायकवाड, नंदकुमार दत्तात्रय कदम, हरिश्चंद्र सीताराम जाधव, शिल्पक शरद हाटे, बईमा कमरुद्धीन शेख, सिंधू मधुकर पाडळकर यांचाही समावेश आहे.
Continues below advertisement
6/10
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या 6.45 हेक्टर जागेवर तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळींमध्ये 3344 भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत.
7/10
पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट 'ब' मधील 1401 रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये 8 पैकी 5 पुनर्वसन इमारतींतील 864 सदनिकांच्या चाव्या आज देण्यात आल्या. उर्वरित 537 सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिल 2026 मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प राबवितांना एकूण भूखंडापैकी सुमारे 65 टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे.
8/10
तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्लॉट 'अ' मधील 19 चाळींच्या जागेवर प्रस्तावित 12 पुनर्वसन इमारतींपैकी 3 पुनर्वसन इमारतींचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. तसेच चाळीतील रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण गाळे यापैकी पर्याय निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला. निवासी व अनिवासी गाळेधारकास 25 हजार रुपये प्रति महिना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात येत आहे.
9/10
पुनर्विकासाचे काम अधिक वेगाने पूर्ण करून 2029 पर्यंत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सर्व रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
10/10
मुंबईत सध्या जवळपास 1000 एकर क्षेत्रफळावर विविध पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. मुंबईतील मध्यमवर्गीय नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Published at : 16 Mar 2026 03:20 PM (IST)