मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी मनोऱ्यावर 'छावा', कवी कलश अन् संभाजीराजेंचं बलिदान; मुख्यमंत्रीही भावुक
देशभरात आज दहीहंडी उत्सावाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रात गोविंद पथकांचे उंचच उंच मनोरे पाहायला मिळत आहे.
Mumbai dahihandi Govinda present chhaava
1/10
देशभरात आज दहीहंडी उत्सावाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रात गोविंद पथकांचे उंचच उंच मनोरे पाहायला मिळत आहे.
2/10
मुंबईतील अनेक मंडळांकडून, राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडूनही मोठ-मोठ्या पथकांची सलामी देण्यात येत आहे. अगदी 9 ते 10 थरांपर्यंत गोविंद पथकांकडून सलामी दिली जात आहे.
3/10
छत्रपती गोविंदा पथकाने पुन्हा ९ थर रचण्याचा प्रयत्न केला, छत्रपती गोविंदा पथकाकडून ९ थर रचण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला, त्यांचा दुसरा प्रयत्न देखील अपयशी झाल्याचं पाहायला मिळालं.
4/10
लाखोंची बक्षीसं असणारी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे वरळीच्या जांबोरी मैदानावरील परिवर्तन दहिहंडी 2025 होय. भाजपा मुंबईच्यावतीने येथे दहीहंडी उत्सव सुरू असून गोविंदा पथकांसह चाहत्यांचीही मोठी गर्दी येथे जमली आहे.
5/10
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहीहंडी सोहळ्याला उपस्थित राहत, येथे हंडी फोडली. त्यानंतर, येथील दहीहंड उत्सवात गोविंद पथकाने उंचच उंच थर लावून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
6/10
ना. अॅड आशिष शेलार आणि भाजपा-मुंबई आयोजक अॅड. संतोष पांडे यांच्याकडून वरळीत परिवर्तन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा झाला.
7/10
येथील दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने चक्क छावा सिनेमातील दृश्यच उंच मनोऱ्यावर सादर केले. यावेळी, छावा सिनेमातील अंगावर शहारे आणणारा वाघाच्या जबड्यात हात घातल्याचा सीनही केला.
8/10
छावा सिनेमातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत गोविंदांनी उंच मनोऱ्यावर उभे राहून सादरीकरण केले. यावेळी, कवी कलश यांच्या कविता, संभाजीराजेंची भेट हा सीन पाहून अनेकजण भारावून गेले
9/10
संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज भेट, तसेच संभाजीराजेंच्या शौर्याचं बलिदान या दृश्यातून साकारण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भारावल्याचं दिसून आले, त्यांनी टाळ्या वाजवून गोविंदा पथकाला दाद दिली.
10/10
राणी द्विवेदी आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो, ज्याप्रकारे गोविंदा पथकाने छावा साकारला आहे, छत्रपती संभाजीराजेंचं शौर्य मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.
Published at : 16 Aug 2025 01:59 PM (IST)