Mumbai Traffic: मुसळधार पाऊस अन् वाहतूक कोंडी; मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा, एक तासाच्या प्रवासासाठी लागतायत अडीच ते तीन तास

Mumbai Traffic: जोरदार पाऊस आणि रस्त्यावर व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे वाहन चालक गाड्यांचे हेडलाईट चालू करून हळूहळू मार्ग काढताना रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

Mumbai Traffic

1/8
मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
2/8
पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली कडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागला आहे.
3/8
या जोरदार पावसामुळे सांताक्रुझ,विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड,कांदिवली परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
4/8
बोरिवली ते वांद्रे एक तासाचा प्रवास मात्र वाहन चालकांना या वाहतूक कोंडीमुळे अडीच ते तीन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे.
5/8
जोरदार पाऊस आणि रस्त्यावर व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे वाहन चालक गाड्यांचे हेडलाईट चालू करून हळूहळू मार्ग काढताना रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
6/8
पश्चिम द्रुतगती महामार्गाची ही वाहतूक कोंडी काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देखील मोठा युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.
7/8
जोगेश्वरी परिसरातील या वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणावर नागरिकांना होतो आहे. मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाला बघता मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत.
8/8
अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा तसेच किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचं मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे, त्याचबरोबर सांभाळून गाडी चालवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.आपत्कालीन स्थितीत 100, 112 आणि 103 वर संपर्क करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
Sponsored Links by Taboola