Maharashtra Maritime Board : भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग समुद्राने पोहोचा; तुमची कारही सोबतीला नेता येणार
Maharashtra Maritime Board : भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग समुद्राने पोहोचा तुमची कारही सोबतीला नेता येणार
Continues below advertisement
मुंबई विजयदुर्ग रो-रो सेवेसाठी एप्रिलचा मुहूर्त
Continues below advertisement
1/9
मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुटणारी ही बोट अवघ्या पाच तासांत विजयदुर्गला पोहोचणार आहे.
2/9
यामुळे सध्या 12 ते 14 तास लागणारा मुंबई–गोवा महामार्गावरील प्रवास टळणार आहे.
3/9
ही सेवा प्रथम गणेशोत्सव 2025 मध्ये सुरू करण्याचा मानस होता, मात्र तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला.
4/9
आता मार्चमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू केली जाणार आहे.
5/9
ही सेवा यशस्वी ठरल्यास कायमस्वरूपी सुरू ठेवली जाईल, असे सागरी मंडळाने स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
6/9
प्रवासी तिकीट दर अंदाजे 2,500 ते 9,000 पर्यंत असतील.
7/9
दुचाकी, चारचाकी, बस अशा वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
8/9
चारचाकीसाठी सुमारे 6,000 तर मोठ्या बससाठी 21,000 पर्यंत दर असू शकतात.
9/9
या सेवेचा हापूस आंबा वाहतूक आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
Published at : 16 Feb 2026 04:34 PM (IST)
= 9">