मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या 5 दिवसांत मुंबईत पावसाने धुमाकूळ घातल्याचं दिसून आलं.

Mumbai mahapalika tree collapse 400
1/10
मुंबईत आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या 5 दिवसांत मुंबईत पावसाने धुमाकूळ घातल्याचं दिसून आलं.
2/10
पश्चिम उपनगरात दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि वांद्रे या परिसरात आज पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी अजून भरला नाही.
3/10
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील तीन दिवसाच्या पावसामध्ये तब्बल 400 झाडं पडली असून 600 फांद्या पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
4/10
जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ही 400 झाडं पडल्याची आकडेवारी महापालिकडे प्राप्त झाली आहे. महापालिकेकडून ही झाड आणि त्याच्या फांद्या बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर ठिकठिकाणी गार्डन विभागाकडून सुरू आहे.
5/10
मुंबईतील दादर, माहीम आणि प्रभादेवी भागात 100 च्या जवळपास झाड आणि फांद्या पडल्याची नोंद झाल्याची माहिती आहे.
6/10
मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या शिवाजी पार्क परिसर आणि त्या आसपासच्या परिसरात सगळीकडे पडलेली झाड आणि फांद्यांनी अनेक ठिकाणी फुटपाथ व्यापून गेला आहे.
7/10
महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी हे सगळे रस्त्यावर येऊन आपला परिसरात स्वच्छ कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत.
8/10
पाच सहा दिवसात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तेव्हा महानगर पालिकेकडून तात्काळ मदत दिली गेल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
9/10
यंदाच्या पावसाचे वैशिष्ट्य असं होत की वाऱ्याचं प्रमाण अधिक होता, त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे झाडांच झालं आहे. जेवढी वर्षाला झाड पडतात, त्यापेक्षा 50 टक्के झाड एका दिवसात पडली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
10/10
यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच 1238 झाडाच्या फांद्या पडल्या आहेत, तर झाड पडल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, असेही अश्विनी भिडे यांनी सांगितले.
Published at : 07 Jul 2026 03:06 PM (IST)