Mumbai Heavy Rain Updates: मुंबईत मुसळधार; सर्वत्र अंधार काळे ढग; सकाळीच वाहनांच्या हेडलाईट अन् पार्किंग लाईट चालू, PHOTO

Mumbai Heavy Rain Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Continues below advertisement

Mumbai Heavy Rain Updates

Continues below advertisement
1/6
Mumbai Rains: हवामान खात्याने आज मुंबईसाठी रेड अलर्ट वर्तवला आहे. सकाळपासूनच उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
2/6
वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतोय. वांद्रे-सी लिंक रोडवर संध्याकाळसारखा अंधार दाटून आला आहे.
3/6
सर्वत्र काळे ढग पसरल्याने वाहनांना सकाळीच हेडलाईट व पार्किंग लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.
4/6
आज रविवार असल्याने शाळा आणि बहुतांश कार्यालयं बंद आहेत, त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास होण्याची शक्यता नाही. मात्र महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासन सतर्क असून, संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
5/6
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Continues below advertisement
6/6
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.
Sponsored Links by Taboola