Mumbai Fire News: मुंबईच्या जोगेश्वरीत अग्नितांडव, अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले, दहाव्या मजल्यावरुन मदतीसाठी हाक, PHOTO
Mumbai Fire News: मुंबईच्या जोगेश्वरी (पश्चिम) परिसरात असलेल्या JNS Business Park इमारतीत आज सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Fire News
1/10
आज (गुरुवार) सकाळी 10:51 वाजण्याच्या सुमारास, जोगेश्वरी पश्चिम, ओशिवरा येथील JNS Business Park इमारतीत आग लागली. ही इमारत एस.व्ही. रोडवरील गांधी शाळेजवळ बेहरामपाडा परिसरात आहे.
2/10
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने (MFB) आगीला Level-2 घोषित केले.
3/10
सुरुवातीला आग एका गाळ्यात लागली होती, मात्र काही वेळातच ती चार मजल्यांवर पसरली.
4/10
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या दाखल झाल्या असून, जवानांकडून आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे.
5/10
आतापर्यंत 12 ते 14 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. आणखी 5 ते 6 जण दहाव्या मजल्यावर अडकलेले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
6/10
आगीमध्ये एक ते दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
7/10
सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
8/10
इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिस आणि व्यापारी गाळे असल्याने, आग वेगाने वाढली. काही लोक काच फोडून मदतीसाठी हाका मारताना दिसले.
9/10
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विद्युत शॉर्टसर्किटची शक्यता तपासली जात आहे.
10/10
आगीमुळे इमारतीतील कार्यालयीन साहित्य, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Published at : 23 Oct 2025 01:19 PM (IST)