Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
Sanjay Raut: मी वर्षा बंगल्यावर राहायला जाईन पण रात्री झोपणार नाही, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमागचं कारण राऊतांनी सांगितलं. वर्षा बंगल्याच्या लॉनवर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरली.
Varsha Bungalow in Mumbai
1/8
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल परिसरातल वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत. मी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
2/8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर राहायला का गेलेले नाहीत? त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले. मग ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
3/8
मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान राज्याच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे. मग आमचे लाडके मुख्यमंत्री तिकडे राहायला का जात नाहीत? मी असं ऐकलंय की, देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की, मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही. राज्यातील लिंबू सम्राटांनी याचं उत्तर द्यावे. शिंदे गटात असे अनेक लिंबूसम्राट आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
4/8
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा बंगल्याबाबत अत्यंत स्फोटक दावा केला. भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत, असे त्यांनी म्हटले.
5/8
कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
6/8
कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहेत, अशी कुजबुज असल्याचा राऊतांचा दावा
7/8
गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे.
8/8
वर्षा बंगल्यावर बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरल्याच्या संजय राऊतांच्या दाव्यामुळे महाराष्टाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published at : 04 Feb 2025 02:07 PM (IST)
= 8">