Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup Bus Accident: भांडुप रेल्वे स्थानक येथे काल रात्री भीषण अपघात घडला. एका इलेक्ट्रिक बसने 13 निरपराध नागरिकांना चिरडलं.

Bhandup Bus Accident
1/8
Bhandup Bus Accident: भांडुप रेल्वे स्थानक येथे काल रात्री भीषण अपघात घडला.
2/8
29 डिसेंबरच्या रात्री साडेनऊच्या दरम्यान रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर बस गेल्याने 4 जणांचा जागीच मृत्यु झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.
3/8
जखमींना राजेवाडी व अग्रवाल रुग्णालयात दाखल केले गेले असून चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
4/8
दरम्यान या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
5/8
बससाठी अनेक प्रवासी रांगेत उभे होते. इतक्यात मागून बस येते आणि प्रवाशांच्या दिशेने धडकते.
6/8
बस जोरात येताच महिलांना जागेवरुन हलताही आलं नसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.
7/8
बस मागे घेताना चालकाचा ताबा सुटला आणि सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
8/8
अपघात स्थळाजवळील एका कपड्यांच्या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
Published at : 30 Dec 2025 08:27 AM (IST)