एक्स्प्लोर
Ambedkar Jayanti 2025: डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1395 टन धातू खरेदी, 230 फुटांचं थर्माकॉलचं मॉडेल तयार, कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?
Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती असून देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी आंबेडकरी बांधव रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.
Ambedkar Jayanti 2025
1/10

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी 1395 टन धातूची गरज लागणार आहे. सरकारकडून त्याची खरेदी करण्यात आली आहे.
2/10

येत्या काही दिवसांमध्ये कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. इंदू मिलमधील पादपीठ इमारत आणि पुतळ्याचे 20 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
3/10

इंदू मिलच्या 12 एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या स्मारकाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारणी केली जात आहे. यामध्ये 100 फूट उंचीची स्मारकाची पादपीठाची इमारत असेल. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे.
4/10

सध्या या पुतळ्याच्या उभारणीचे काम शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात सुरु आहे.
5/10

या प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी 2018 मध्ये सुरुवात झाली होती. 2021 मध्ये इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता या कामाला मुदतवाढ देण्यात आली असून डिसेंबर 2025 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये हे स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
6/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणी करण्यापूर्वी थर्माकॉलचे मॉडेल साकारले जात आहे. पुतळ्याच्या पायथ्यापासून ते 230 फुटांपर्यंतच्या उंचीच्या थर्माकॉल मॉडेलचे काम पूर्ण झाले आहे.
7/10

आता या थर्माकॉल मॉडेलच्या साहाय्याने धातूचा पुतळा तयार केला जाणार आहे. या पुतळ्याची स्मारकाच्या जागी आणून जोडणी केली जाणार आहे. सध्या राम सुतार यांच्या कारखान्यात 155 मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन आणि उभारणी पूर्ण झाली आहे. इंदू मिल स्मारकातील सहायक इमारतीचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
8/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 1090 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या स्मारकाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दल आंबेडकरी अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.
9/10

आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदू मिल स्मारकाचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत काही माहिती देणार का, हे बघावे लागेल.
10/10

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
Published at : 14 Apr 2025 07:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र

















