Yavatmal News : पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या पंपावरच कायद्याचे उल्लंघन; डबे अन् कॅनमधून सर्रास पेट्रोलचं वितरण; अफवांमुळे यवतमाळच्या मारेगावात लांबचं लांब रांगा
Yavatmal Petrol Shortage: यवतमाळच्या मारेगाव येथे पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शहरातील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपाव डबे व कॅनमध्येही इंधन नेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
Continues below advertisement

Yavatmal Petrol Shortage
Continues below advertisement
1/7
Yavatmal News : अफवांच्या बाजारामुळे गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ठेवण्यासाठी वाहनधारकांची राज्यातील अनेक पेट्रोल पंपवर तोबा गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
2/7
अशातच यवतमाळच्या मारेगाव येथे पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शहरातील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली.
3/7
मात्र यावेळी नागरिकांनी चक्क डबे आणि कॅनमध्येही इंधन साठवण्याचा प्रयत्न केलाय. डबे, बॉटल्स आणि कॅनसारख्या गोष्टीमध्ये पेट्रोल देता येत नाही, त्या संदर्भात नियम असून असं करणं बेकायदेशीर आहे.
4/7
असे असताना पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्याच पंपावर कायदाचे उल्लंघन होत असल्याचं पुढे आले आहे.
5/7
सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे पुरवठा खंडित होणार असल्याची चर्चा व्हायरल झाल्याने ही परिस्थिती निर्माण झालीय.
Continues below advertisement
6/7
यवतमाळच्या मारेगाव येथे रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच तब्बल दोन वाजेपर्यंत नागरिकांनी इंधन भरण्यासाठी धावाधाव केली. अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून घेतल्या, तर काहींनी डबे व कॅनमध्येही इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.
7/7
सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे पुरवठा खंडित होणार असल्याची चर्चा व्हायरल झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र, अधिकृतरीत्या कोणताही तुटवडा नसल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published at : 25 Mar 2026 02:38 PM (IST)