Udayanraje Bhosale: शहीद अर्जुन जाधव यांच्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याला कडेवर घेताच उदयनराजे भावूक; शहापूरमध्ये डोळे पाणावणारी सांत्वन भेट
Udayanraje Bhosale : शहीद अर्जुन जाधव यांच्या कुटुंबियांची उदयनराजे यांनी शहापूरमध्ये सांत्वन भेट घेतली. यावेळी 11 महिन्याच्या चिमुकल्याला कडेवर घेताच उदयनराजे भावूक झाले.

Udayanraje Bhosale
1/9
Indian Army Jawan Arjun Jadhav Martyr: जम्मूतील पुरी येथे झालेल्या स्फोटात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद वीर जवान अर्जुन जाधव यांच्या निवासस्थानी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
2/9
काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण आले. 25 जूनला आपल्या 11 महिन्यांच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त घरी येण्याची त्यांची योजना होती. मात्र त्याआधीच त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून शहापूर येथे पोहोचले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.
3/9
यावेळी शहीद अर्जुन जाधव यांचे अवघे 11 महिन्यांचे चिमुकले बाळ पाहून उदयनराजे भावूक झाले.
4/9
त्यांनी त्या चिमुकल्याला कडेवर घेतलं, मायेने डोक्यावरून हात फिरवत त्याच्याशी काही क्षण खेळले आणि त्याला प्रेमाने जवळ घेतले.
5/9
पित्याच्या मायेपासून कायमचा दुरावलेल्या त्या निरागस बालकाकडे पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले.
6/9
उदयनराजे भोसले यांनी जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला आणि शहीद अर्जुन जाधव यांच्या बलिदानाला कृतज्ञ अभिवादन केले.
7/9
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही वीर जवान महाराष्ट्राचे सुपुत्र होते. मंगळवारी उशिरा संध्याकाळी उरी येथील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना हा स्फोट झाला. (Uri LoC Blast)
8/9
या स्फोटात वीरमरण आलेल्या दोन्ही जवानांची ओळख पटली असून, वीर जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी होते. तर वीर जवान अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर गावचे रहिवासी होते. (Uri LoC Blast)
9/9
दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. त्यांनतर त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेनं देशभरात शोककळा पसरली आहे.
Published at : 14 Jun 2026 09:37 AM (IST)