Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: नवरी झाल्या दोन जुळ्या बहिणी, नवरदेव एकच; अकलुजमधील चर्चेत आलेल्या लग्नाचे भन्नाट फोटो पाहा...
एका मांडवात एकाच वेळी दोन जुळ्या बहिणींसोबत पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूळचा महाळुंग परिसरातील अतुल आवताडे याने मुंबईच्या कांदिवली येथील रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं.
अनोख्या विवाहानंतर सोशल मीडियात यावर प्रतिक्रिया उमटू लागताच पोलिसांनी एकाच्या तक्रारींवर अदखलपात्र नोंद घेतली आहे.
समाजातील महिला वर्ग आक्रमक झाल्याने पोलिसांच्या समोरचा पेच देखील वाढत चालला आहे.
एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय.
अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.
तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत.
सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती.
यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.